Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही

मुंबई, दि.12 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. याचा फायदा घेऊन काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत असल्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे  देखील येत आहेत.

या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येणार आहे. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading