Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRA

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

नालासोपारा, दि.१२ – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त वंचित बहुजन आघाडी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराचे उदघाटन नालासोपारा (पुर्व) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रेमदास राठोड यांची मुलगी व बाळासाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला स्थानिक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीचा ही कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा अध्यक्ष हर्षद खंडागळे, पालघर जिल्हा महिला अध्यक्षा रेखा अवचार, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष प्रवीण (दादा) गायकवाड हे उपस्थित होते. महानगर पालिका सचिव रेणुका जाधव, महानगर पालिका सदस्य स्नेहलता, दिलीशा, वॉर्ड अध्यक्ष सचिन जाधव तसेच कार्यकर्ते, साक्षी जाधव व राधिका संसारे यांनी डॉक्टर व त्यांच्या पथकातील लोकांची जेवणाची व्यवस्था केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading