Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PUNE – आजपासून दुपारी 12 नंतर कडक लॉकडाउन

पुणे -पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत असला तरी रुग्णसंख्येतील वाढ अजूनही हजाराच्या घरात आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने पुण्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आज (मंगळवार)पासून दुपारी 12 नंतर पुण्यातील रस्त्यांवर विनाकारण फिरण्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे 

आज पासून पुण्यातील लॉकडाऊन कडक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय.
दुपारी 12 वाजल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. — पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading