Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

शव वाहिकेच्या सेवेत आमुलाग्र बदल, सुसूत्रता आणि तत्पर सेवेस प्राधान्य – श्रीनिवास कंदुल

पुणे, दि. १०: शव वाहिकेच्या सेवेत आमुलाग्र बदल केले असून कोरोनाच्या संकटकाळात या सेवेत सुसूत्रता आणि तत्पर सेवेस प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचे मनपा उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. आज 40 शववाहीका शहरातील आठ भागात ठेवण्यात आल्या असून प्रत्येक भागात 5 याप्रमाणे व्यवस्था केली असून प्रतीक्षा काळ खूप कमी झाला असल्याचे ही कंदुल म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सुमीरन हेल्थ केयर च्या वतीने शव वाहीका चालकांना पिपीई किट, सॅनिटायझर, मास्क, हंडग्लोव्हज व इतर साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप च्या कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, उपाध्यक्ष राज तांबोळी,संगीताताई शेवडे,माजी नगरसेवक विकासनाना दांगट, भाजप वैद्यकीय आघाडी च्या प्रदेश सह संयोजक डॉ. तेजस्विनी अरविंद,अमोल चौधरी,संतोष गायकवाड,रुपेश अटक आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या परिचयातील अनेक स्नेही कोरोना चे बळी ठरत आहेत अश्या वेळी रात्री अपरात्री शव वाहिकेसाठी फोन येतात.  त्यावेळी पुष्पक च्या सेवेचा चांगला अनुभव येतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. श्रीनिवास कंदुल आणि त्यांच्या टीम ने उत्तम नियोजन केले असून त्यातून मयताच्या कुटुंबियांना आधार मिळतो, ताटकळत बसायची वेळ येत नाही आणि कोरोना रुग्णाचा ऑनलाईन मृत्यू पास तयार झाल्यावर लगेचच रुग्णालयात किंवा घरी पुष्पक त्याठिकाणी पोहोचते हे सेवा कार्य उल्लेखनीय असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी व्हेईकल डेपो चे प्रभारी सुपरवायझर बाळासाहेब जगदाळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. सध्याच्या महामारी च्या काळात कोरोना योद्धांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे असून त्याचं भावनेतून त्यांच्या साठी पिपीई किट देण्याचे ठरविले असे सुमीरन हेल्थ केयरच्या मंजिरी दीक्षित म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading