Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

कोविड रुग्णांचे अंत्यविधी करणाऱ्या ललित जाधव यांना मदत

पुणे : कोरोना महामारीने मृत झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी कुटुंबियांना करता येत नाही. मानवी आयुष्यातील हा शेवटचा विधी असतो, त्यामुळे तो महत्त्वाचा असतो. हेच महत्त्वाचे काम कैलास स्मशानभूमीमधील ललित जाधव आणि त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रशांत गांधी यांनी त्यांना मदत करुन त्यांचा सन्मान देखील केला. 

अभिनंदन प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत गांधी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून सणस मैदानासमोरील चौकात कार्यकर्त्यांसह एकत्र येत कोविड रुग्णांचे अंत्यविधी करणाºया ललित जाधव आणि त्यांच्या सहकाºयांना ११ हजार रुपये रोख रक्कम, कपडे व धान्य स्वरुपात मदत केली. यावेळी सुरेश जैन, नगरसेवक संतोष कदम, संजय रसाळे, विशाल पवार, मदन कोठुळे, शैलेश बडदे, प्रकाश बाफना, अजिंक्य पालकर, अभिजीत महामुनी, महादेव ढमाले, अमोघ ढमाले, राजेंद्र जाजू उपस्थित होते. 
प्रशांत गांधी म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात कोरोनाग्रस्तांपासून लांब राहिले जाते. परंतु ललित जाधव आणि त्यांचे सहकारी कोरोनामुळे मृत रुग्णांचे अंत्यविधी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. या काळात प्रत्येकाने आपल्याला जमेल तसे आपल्या आजूबाजूला असणाºया गरजूंना मदत करावी. मदत करण्याची हीच खरी वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading