बांबू सोसायटीच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या चेअरमनपदी बांबू संशोधक डॉ.हेमंत बेडेकर यांची निवड
पुणेः- बांबू सोसायटीच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या चेअरमनपदी ज्येष्ठ बांबू संशोधक डॉ. हेमंत बेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. मावळते चेअरमन आर्किटेक्ट सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीतनवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
संशोधक डॉ. मेधा जोशी यांची कार्यकारी संचालकपदी आणि बांबू केमिकल उत्पादक श्रीकृष्ण कुलकर्णी यांची सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी आहे. तसेच बांबू क्षेत्रात भरीव कामगिर करणारे विनय कोलते, बांबू सायकल निर्माते निलेश मिसाळ, आर्किटेक्ट महेश मोखा, आर्किटेक्ट प्रार्थना महाकाळ, बांबू टेलचे अशोक सातपुते, आर्किटेकट पराग घुबडे, बांबू तज्ञ सलीम सय्यद, बांबूपासून ऊर्जा निर्माण क्षेत्रात कार्य करणारे अरुण वांद्रे, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि बांबू दागिने तयार करणा-या दया पत्की, आर्किटेक्ट मेघा पंचारिया , मराठवाड्यात बांबू लागवडीसाठी प्रयत्न करणारे राजकुमार दडगे, बांबू डिझायनर रवी नाफडे यांची तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
