Saturday, May 30, 2026
PUNE

अध्यात्माने परिपूर्ण श्री अक्कलकोट स्वामी दैनंदिनी उपयुक्त – चारूदत्त आफळे

पुणेः- नित्योपयोगी आणि अध्यात्माने परिपूर्ण अशी श्री अक्कलकोट स्वामी दैनंदिनी ही आजच्या डीजीटलायझेशनच्या काळातही अतिशय उपयुक्त आहे. ज्येष्ठांपासून तरूणांपर्यंत आणि व्यावसायिकांपासून गृहिणींपर्यंत सगळ्यांसाठीच ही दैनंदिनी मार्गदर्शक आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी व्यक्त केले. 

राम न्यूज पेपर एजन्सीतर्फे श्री अक्कलकोट स्वामी देनंदिनी 2021 चे प्रकाशन आज  राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आफळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहीर हेमंतराजे मावळे,  संपादक राम दहाड, संस्थापक श्रीराम दहाड आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना चारूदत्त आफळे म्हणाले की, अनेकदा आणीबाणीचे प्रसंग निर्माण झाल्यानंतर संबंधित विभागांचे दूरध्वनी क्रमांक आपल्याला उपलब्ध होत नाहीत. मात्र, या दैनंदिनीत समाविष्ट करण्यात आलेल्या या दूरध्वनी क्रमांकांमुळे आपली समस्या सुटण्यास ही दैनंदिनी उपयुक्त ठरणार आहे. 

यावेळी बोलताना शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले की, कर्मात आणि वर्तनात प्रामाणिकपणा असला की कार्य सिद्धीस जातेच. श्री अक्कलकोट स्वामी दैनंदिनीच्या प्रकाशनाचे सातत्य पाहता या कार्यातील सचोटी सिद्ध होते. 
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम न्यूज पेपर एजन्सीचे संपादक राम दहाड यांनी केले. श्रीराम दहाड यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading