Saturday, September 5, 2026
PUNE

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे ‘पंचतत्वा’वरील आॅनलाईन व्याख्यानमाला

पुणे, प्रतिनिधी : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पंचतत्वावरील आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गणेशतत्वापासून ते आरोग्यतत्वापर्यंत विविध विषयांचा समावेश आहे. दिनांक १६ मे पर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन भाविकांना पाहता येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी यांनी दिली.

ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी व विद्यमान अध्यक्ष सुनिल रुकारी यांच्या उपस्थितीत दत्तमंदिराचा इतिहास व माहिती सांगत व्याख्यानमालेचे उद््घाटन झाले. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, महेंद्र पिसाळ आदी आॅनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

डॉ.पराग काळकर म्हणाले, गणेशतत्व, देवी तत्व, विष्णुतत्व, दत्ततत्व, रुद्रातत्व, सूर्यतत्व याविषयांवर दररोज अमोल मुळे गुरुजी हे संवाद साधणार आहेत. तर, व्याख्यानमालेचे समारोप आरोग्यतत्व याविषयाने डॉ.अविनाश भोंडवे हे करणार आहेत. ट्रस्टच्या https://www.facebook.com/groups/dattamandirpune या फेसबुक पेजवरुन ही व्याख्यानमाला भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने व्याख्यानमालेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading