Saturday, September 5, 2026
PUNE

अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त रामेश्वर चौकातील मठात ‘फुलांच्या पालखीची’ आरास

पुणे, प्रतिनिधी: मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्ककोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त फुलांच्या पालखीची आकर्षक आरास करण्यात आली. दरवर्षी असलेली भक्तांची प्रचंड रिघ आणि उत्साह हे चित्र यंदा पहायला मिळाले नाही. मोजके विश्वस्त व पदाधिका-यांची उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न झाले.

मठात सकाळी कोरोना मुक्तीसाठी लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता आरती झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून दुपारी ५०० नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी मूळ पादुका पूजन व आरती संपन्न झाली. यावेळी  संस्थानचे गजानन जेधे, संदीप होनराव, रवींद्र शेडगे, विक्रम आगाशे, श्रीराम पुरंदरे आदी उपस्थित होते.

कमलेश कामठे म्हणाले, श्री अक्ककोट स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त रामेश्वर चौकातील श्री अक्ककोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भक्तांविना साधेपणाने कार्यक्रम झाले. अ‍ॅड.भालचंद्र भालेराव व श्रीकृष्ण केसकर या ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टमधील स्वामी भक्त परिवारातील ४ जणांनी प्लाझ्मा दान व ११ जणांनी रक्तदान करीत जनजागृती देखील केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading