Pune – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र दिले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचेआमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच लक्ष लागले होते.
आमदार चेतन तुपे हे मागील अडीच वर्षापासून पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून त्यांनी शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. अखेर शहराध्यपदाची माळ प्रशांत जगताप यांच्या गळ्यात पडली.
