Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

मुंबई, दि.८ : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.

प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading