Monday, June 15, 2026
PUNE

प्लाझ्मा आणि रक्तदान शिबीराचे आयोजन; मराठा आंर्थप्रनर्स असोसिएशनतर्फे दगडूशेठ चॅरिटेबल ट्रस्टला रूग्णवाहिका प्रदान

पुणेः- मराठा आंर्थप्रनर्स असोसिएशन आणि रोटेरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज डीपी रोड येथील सिद्धी बँक्वेट येथे प्लाझ्मा आणि रक्तदान शिबीराचे तसेच दगडूशेठ चॅरिटेबल ट्रस्टला रूग्णवाहिका प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन बँकींग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुणे शहराचे डीजीएम सेशू बाबू पल्ले यांच्या हस्ते या प्लाझ्मा आणि रक्तदान शिबीराचे उद्घाटन करून दगडूशेठ चॅरिटेबल ट्रस्टला रूग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूना हॉस्पीटलचे डॉ. अजित तांबोळकर, तसेच पुणे महानगर पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील दिगंबर रासने, मराठा आंर्थप्रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे आदी मान्यवर उपस्थित होते.

अरुणा ढोबळे बहीरट पाटील, राजेश कुराडे, अरूण निम्हण, महेश भागवत, महेश घोरपडे, नितीन लोढा, रोटेरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगरचे अध्यक्ष रोटेरियन आनंद माहूरकर, रोटेरियन अविनाश तरवडे, आदींनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

या प्लाझ्मा आणि रक्तदान शिबीरात संकलित झालेले 85 पिशव्या रक्त सह्याद्री हॉस्पीटलच्या रक्तपेढीकडे सुपूर्त करण्यात आले.

कोरोना वॉरियर्स ग्रुप यांच्यावतीने रूग्णालय उपलब्ध होत नसलेल्यास गरजू रूग्णांना तसेच प्लाझ्मा, रक्त, ऑक्सिजन अशा सर्वच पातळ्यांवर सहाय्य केले जाते. तसेच औषधांसाठी तज्ज्ञांचा सल्ला मिळवून दिला जातो.

यावेळी बोलताना हेल्थ क्रॉप संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. मृण्मयी मांगले यांनी सांगितले की, आमच्या संस्थेतर्फे गृह विलगीकरणात असलेल्या कोविड रूग्णांना औषधोपचारासंदर्भात मोफत सल्ला दिला जातो. तसेच ससून रुग्णालयाच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे 25 निष्णात डॉक्टर आमच्या संस्थेच्या उपक्रमाशी निगडीत आहेत. मराठा आंर्थप्रनर्स असोसिएशनने या उपक्रमासाठी आर्थिक पाठबळ दिले असून गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांचा मानसिक व शारीरिक समतोल राखण्यासाठी माहितीपूर्ण चित्रफिती त्यांना पाठवल्या जातात. तसेच ऑक्सिजन पातळीसह श्वसनाशी संबंधित ऑनलाईन मॉनिटरींग सेवा उपलब्ध करून दिली जाते. ही पूर्णतः निःशुल्क टेलि कन्सल्टन्सी असून अशी सेवा देणारी आमची एकमेव संस्था आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी 9822491691 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. मांगले यांनी यावेळी केले. या उपक्रमात हेल्थ क्रॉप संस्थेच्या सहसंस्थापिका डॉ. कोमल बेळमकर, या उपक्रमाचे तांत्रिक सहाय्यक संमेद मांगले यांचेही सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading