Saturday, May 30, 2026
MAHARASHTRANATIONALPUNE

लसीकरणाचा ‘केरळ पॅटर्न’ – कोरोना लसीचा प्रत्येक थेंब आणला वापरात

पुणे – एकीकडे कोरोनाच्या लसीचा तुटवडा, वाया जाणारे लसींचे डोस आणि हवालदिल झालेले जेष्ठ नागरिक… असे चित्र सर्वत्र पहायला मिळत असताना आपल्याच देशातील केरळ राज्याने मात्र, कोरोना लसीकरणाचा प्रत्येक थेंबनथेंब वापरून एक आदर्श घालून दिला आहे. या राज्यात मागील सोमवार अखेर 73 लाख 38 हजार 680 डोस मिळाले होते. यातून येथील आरोग्य कर्मचाऱ्यानीं 74 लाख 26 हजार 164 जणांचे लसीकरण केले आहे.

लसीकरणाच्या या अनोख्या केरळ पॅटर्न ची ही कमाल घडली कशी?, लस ही छोट्या काचेच्या बाटलीत येते. एका बाटलीतून किमान 10 जणांना लस दिली जाते. या लसी दिल्यानंतर सुद्धा थोडा डोस या बाटलीत शिल्लक राहतो. याच शिल्लक राहिल्या थेंबातून आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरनाचा हा आकडा वाढविला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ सरकारचे अभिनंदन करत विजयन यांचे ट्विट रिट्विट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading