fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRANATIONALTOP NEWS

राजन अभी जिंदा है! एम्स रुग्णालयाकडून छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीचे खंडन

नवी दिल्ली – तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, छोटा राजन जिवंत असल्याची माहिती नवी दिल्लीमधील एम्स रुगणालयाने दिली आहे.

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.

एप्रिलच्या मध्यात तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळं ठेवलं गेलं आहे, असं तुरुंग प्रशासने स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. २०१५ सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आलेली. मुंबईतलं राजनविरोधातील हे खंडणीचं तिसरं प्रकरण आहे, ज्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आलेली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading