Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENT

‘फक्त मराठी’वर सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिना!

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मे २०२१ च्या संपूर्ण महिन्यात ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘फक्त मराठी वाहिनी’ने लॉकडाऊनच्या अवघड काळातही प्रेक्षकांच्या शंभरटक्के मनोरंजनाची कास धरली आहे. संपूर्ण मे महिन्यामध्ये दररोज एक सुपरहिट चित्रपट तसेच ‘साईबाबा श्रद्धा सबुरी’ आणि ‘सप्तपदी’ या लोकप्रिय मालिका ‘फक्त मराठी वाहिनी’वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

फक्त मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या एकापेक्षा एक सरस सुपरहिट चित्रपटांबाबत ‘फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, लॉकडाऊन मुळे सगळ्यांना घरात रहावं लागतं आहे. सर्वांवर विशिष्ट ताण आहे. निरोगी अरोग्यासोबतच मानसिक संतुलन राखण्याचीही या काळात सर्वांना गरज आहे. ही गरज दर्जेदार मनोरंजनातून पूर्ण होऊ शकते. म्हणून आमच्या वाहिनीने सर्वांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या सुपरहिट चित्रपटांची बँक प्रेक्षकांसाठी खुली करण्याचे ठरविले आहे. वाहिनीवर दररोज एका सुपरहिट चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बाहेर न पडता, घरात राहून आपल्या आवडत्या चित्रपटांसोबतच ‘साईबाबा श्रद्धा सबुरी’, ‘सप्तपदी’ या मालिका पाहून आपलं टेन्शन घालवावं हा वहिनीचा उद्देश आहे. आम्ही मे महिन्यासाठी जवळपास ३० हून अधिक सुपरहिट चित्रपटांची निवड केली आहे, जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गाजलेले आहेत.

फक्त मराठी वाहिनीच्या या लॉकडाऊन स्पेशल महोत्सवामध्ये ‘फर्जंद’, ‘तुकाराम’, ‘दगडी चाळ’, ‘मोरया’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘राजवाडे आणि सन्स’, ‘वाय झेड’, ‘सतरंगी रे’, ‘तुझं तू माझं मी’(TTMM) ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘तुझ्याविन मर जावा’, ‘देवा’, ‘संदूक’, ‘मस्का’, ‘गणवेश’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘खेळ मांडला’, ‘मंकी बात’, ‘हॉस्टेल डेज’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘जन्मदाता’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘तू तिथं मी’, ‘कळत नकळत’, ‘बंदिवान मी या संसारी’, ‘भेट’, ‘सर्वसाक्षी’, सामना’ इत्यादी दर्जेदार सुपरहिट चित्रपटांचा भरगच्चं बुके आहे.

आपल्या आवडीचा आजचा चित्रपट कोणता? आणि ‘साईबाबा श्रद्धा सबुरी’, ‘सप्तपदी’ मालिकांमध्ये नेमका कोणता ट्विस्ट असणार हे जाणून घेण्यासाठी दररोज पहा आपली आवडती ‘फक्त मराठी वाहिनी’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading