Saturday, May 30, 2026
PUNE

केंद्राच्या दराप्रमाणेच राज्याला लसीचा पुरवठा करा – डॉ. रघुनाथ कुचिक

पुणे, दि. 6 – देशामध्ये उत्पादित होणा-या कोरोना लसीची किंमत केंद्र आणि राज्य सरकारसाठी वेगवेगळी कशी? अशी विचारणा राज्य सरकारच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना केली आहे. केंद्र सरकारला ज्या दराने लस देण्यात आली त्याच दराने महाराष्ट्र सरकारला पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

डॉ. कुचिक यांनी डॉ. हर्षवर्धन यांना दिलेल्या पत्रामध्ये भारतात उत्पादित केल्या जाणा-या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी जगभरात निर्यात करण्यात आल्या. त्यांची निर्यात किंमत भारतातील विक्रीदरापेक्षा कमी आहे. याचा संदर्भ दिला. महाराष्ट्राला सहाशे रुपये दराने लस दिली जाते, हीच लस केंद्र सरकारला 150 रुपयांना मिळत आहे. संपुर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशावेळी एकाच लसीची किंमत असणे अयोग्य आहे, असे नमूद करुन कुचिक यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. अशावेळी केंद्र सरकार ज्या दराने लस खरेदी करत आहे, त्याच दराने लस खरेदी करत आहे, त्याच दराने महाराष्ट्रालादेखील लस मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading