Saturday, May 30, 2026
PUNE

स्वारद फाऊंडेशनतर्फे स्वच्छता मोहिम व औषध फवारणी

मुळशी तालुक्यातील मुठा, भरेकरवाडी, मोरेवाडी, बहुली गावांसह कोथरुडमधील सुतारदरा येथे उपक्रमाचे आयोजन

पुणे : कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात स्वच्छतेचे महत्व जाणून घेण्यासोबतच नागरिकांना पटवून देण्यासाठी स्वारद फाऊंडेशनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मुळशी तालुक्यातील मुठा, भरेकरवाडी, मोरेवाडी, बहुली या गावांसह कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे स्वच्छता मोहिम राबवित कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी देखील केली.

उपक्रमामध्ये फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांसह १६-१७ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

स्वाती मोहोळ म्हणाल्या, ग्रामीण भागासह शहरातील दाट लोकवस्तींमध्ये स्वच्छतेची आवश्यकता आहे. तसेच याविषयी जनजागृती होणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे गावांमध्ये स्वच्छतेकरीता फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अभियान राबविले. तसेच परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचे आवाहनही करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading