२० ते २५ लाख लसी उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करणार – राजेश टोपे
मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्याने १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. पण राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. २० ते २५ लाख लसीचा उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राजेश टोपे म्हणाले, ‘केंद्र सरकारने १ मेनंतर १८ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. लसीचे डोस मिळणे अतिशय कठीण झाले आहे. कोविशिल्ड ३ लाख लसीचा पीओ (पर्चेस ऑर्डर) पाठवला आहे. त्यामुळे ३ लाखांनी काय होणार?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यावेळी आपापल्या २० ते २५ लाख डोस एकत्रितपणे मिळतील त्या दिवशी आपण १८ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण सुरू करू. पण त्यासाठी ज्या काही ऑर्डर असतील त्या ऑर्डर त्वरेने दिल्या जातील. अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.’
