Saturday, May 30, 2026
BusinessLIFESTYLE

एमएसएन लॅबोरेटरीजने कोविडवरील औषधांच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी आणल्या फेवीलो (फेवीपिरवीर) ८०० एमजी टॅब्लेट्स  

पुणे, दि. 30 –  एमएसएन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (एमएसएन लॅब्स) या भारतातील आघाडीच्या एकीकृत फार्मास्युटिकल कंपनीने कोविड-१९ मुळे आलेल्या सौम्य व मध्यम तापावर उपचार म्हणून फेवीपिरवीर या अँटिव्हायरल औषधाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी आपल्या ब्रँडेड जेनेरिक फेवीलो ८०० एमजी टॅब्लेट्स आणत असल्याची घोषणा केली आहे. फेवीलो ८०० एमजीची किंमत एका टॅब्लेटसाठी १४४ रुपये असून प्रत्येक फार्मसीमध्ये हे औषध उपलब्ध असणार आहे.  रुग्णांच्या सुविधेसाठी एमएसएन लॅब्सची फील्ड टीम देखील स्थानिक रिटेल केमिस्ट्सच्या सहयोगाने १७० पेक्षा जास्त शहरांमध्ये हे औषध घरपोच करण्याची सेवा मोफत देण्यासाठी मदत करत आहे.

एमएसएन ग्रुपचे सीएमडी डॉ. एमएसएन रेड्डी यांनी सांगितले, “भारतात कोविड-१९ च्या केसेस वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी उपचारांचे किफायतशीर पर्याय उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे.  आम्हाला खात्री आहे की, फेवीलो ८०० हे आमचे उत्पादन कोविडच्या विरोधातील लढाईत देशाचे बळ वाढवेल.”

 

एमएसएनने फेवीपिरवीरचे जगातील सर्वात किफायतशीर ब्रँडेड जेनेरिक फेवीलो (२०० व ४०० एमजी) गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात बाजारपेठेत दाखल केले.  एमएसएनचा असा दावा आहे की, औषधाची ताकद अधिक जास्त असल्यामुळे रुग्णाला दर दिवशी घ्याव्या लागणाऱ्या टॅब्लेट्सची संख्या कमी होऊन रुग्णांकडून औषधे व्यवस्थित घेतले जाण्याचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अनुभवात सुधारणा होईल.  हे औषध उपलब्ध करवून दिले जात असल्याने कोविड-१९ वरील औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांना सहन कराव्या लागत असलेल्या समस्या देखील दूर होतील.

एमएसएन ग्रुपचे कार्यकारी संचालक  भारत रेड्डी म्हणाले की, “गेल्या पंधरा दिवसात एमएसएन कोविड-१९ वरील उपचारांसाठी १ लाखांहून जास्त डोसेज रेजिमे (फेवीलोच्या विविध स्ट्रेंथ्सच्या ५ लाख *स्ट्रिप्स) चे उत्पादन करत आहे.  पुढील महिन्यापर्यंत उत्पादनाचे प्रमाण ६ ते ८ लाख डोसेज रेजिमेपर्यंत (फेवीलोच्या विविध स्ट्रेंथ्सच्या ३० लाख स्ट्रिप्स) वाढवले जाणार आहे.”

 

एमएसएनच्या फेवीपिरवीर ८०० एमजीच्या अधिक जास्त स्ट्रेंथला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) मान्यता दिली आहे.  एमएसएनने फेवीलो ८०० एमजीसाठी ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट (एपीआय) आणि फॉर्म्युलेशन आपल्या स्वतःच्या संशोधन व विकास आणि उत्पादन युनिट्समध्ये यशस्वीपणे विकसित केले आहे.  फेवीलोचे एपीआय व एफडीएफ हे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांना अनुसरून आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष डोमेस्टिक फॉर्म्युलेशन आशिष गुप्ता यांनी सांगितले, “फेवीलो सहजासहजी, सर्वत्र उपलब्ध व्हावे आणि औषधांच्या तुटवड्याची सध्या भेडसावत असलेली समस्या दूर व्हावी यासाठी एमएसएन टीम देशभरातील डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि रुग्णांसोबत संपर्क व संवाद साधत आहे.  फेवीलो हेल्पलाईन उपक्रमामुळे जवळपासच्या केमिस्ट्सकडून औषध उपलब्ध करवून देऊन १००० पेक्षा जास्त रुग्णांना याआधीच मदत पुरवली गेली आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading