Saturday, May 30, 2026
Business

होंडा टुव्हीलर्स इंडियातर्फे ४ कारखान्यांतील उत्पादन तात्पुरते स्थगित

गुरुग्राम, दि. 30 –  कोविड- १९ च्या दुसऱ्या उद्भवलेली तीव्र गंभीर परिस्थिती आणि देशातील विविध शहरांमधे असलेला लॉकडाउन लक्षात घेता होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) आपल्या ४ कारखान्यांतील उत्पादन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ मे २०२१ पासून अमलात येणार आहे.

 

होंडातर्फे उत्पादनातील या स्थगितीचा वापर (१ मे ते १५ मे २०२१) कारखान्यांची वार्षिक देखभाल पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे. बदलती कोविड परिस्थिती आणि बाजारपेठ पूर्वपदावर आल्यानंतर होंडा पुढील काही महिन्यांत उत्पादन योजनेचा आढावा घेईल.

 

त्याचप्रमाणे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी होंडा कार्यालयाचे सर्व सदस्य कामात खंड पडू न देण्याठी घरून काम करतील व ग्राहक आणि व्यावसायिक भागिदारांना आवश्यक ती सर्व मदत करतील. आमच्या कारखान्यांमधे तसेच देशभरातील कार्यालयांमधे केवळ आवश्यक कर्मचारी वर्ग कार्यरत राहाणार आहे.

 

सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक या नात्याने होंडा सर्व भागधारकांच्या सुरक्षेसाठी शक्य ते प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी बांधील आहे.

 

  • होंडा टुव्हीलर्स इंडियाचे उत्पादन कारखाने मानेसर- हरियाणा, तापुकारा- राजस्थान, नरसापुरा – कर्नाटक आणि विठ्ठलपूर- गुजरात येथे कार्यरत आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading