fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

दुर्लक्षित कलाकारांच्या २५ कुटुंबाना धान्यरुपी मदत

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मागील एका वर्षापासून मनोरंजनात्मक सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. रसिकांचे मनोरंजन करणारे हे कलाकार आणि त्यांचे कुटुंब काम नसल्याचे हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवक हेमंत रासने यांनी स्वखर्चातून २५ कलाकारांच्या कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य दिले आहे.

आर्टिस्ट फाऊंडेशनमधील हे २५ कलाकार असून सदाशिव पेठेतील हेमंत रासने यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या येथे कलाकारांना ही मदत देण्यात आली. यावेळी नगरसेवक हेमंत रासने, दिपक वाईकर, यतिश रासने, सनी सिद्ध आदी उपस्थित होते.

हेमंत रासने म्हणाले, कोरोनामुळे समाजातील सगळयाच घटकांवर अडचणीचा प्रसंग आला आहे. अनेकांच्या हाताचे काम थांबल्यामुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून कलाकारांचे काम बंद असल्यामुळे कोणतेही शो, नाटक, गाण्याचे आणि तत्सम कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे कलाकारांचे काम थांबले आहे. या परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी दुर्लक्षित कलाकारांना १ महिन्याचे धान्य देण्यात आले आहे.

आम्हाला पैसे मिळावे, केवळ याउद््देशाने रसिकांचे मनोरंजन केले जात नाही. तर, आपल्या पारंपरिक लोककला जपण्यासह आधुनिक कला रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही कलाकार करीत असतो. ज्याप्रमाणे रंगमंचावर कला सादर करताना टाळ्यांची दाद मिळते, तशीच आता संकटकाळात मदत देखील मिळावी, अशी अपेक्षा कलाकारांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading