कोरोना – राज्यात आज ६८ हजार ५३८ रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांचा (Corona) आकडा अद्यापही कमी होत नाहीय. गेल्या २४ तासांत ६६ हजार १५९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर, ६८ हजार ५३८ कोरोनाबाधितांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यावेळी मृतांचा आकडाही वाढलेलाच दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत ७७१ बाधितांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
आज ६८ हजार ५३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ८३.६९ टक्के रिकव्हरी रेट आहे. तर ७७१ मृतांची नोंद झाली असून सध्या राज्यात १.५ टक्के मृत्यूदर आहे.
एकूण २ कोटी ६८ लाख १६ हजार ७५ अहवालांपैकी आतापर्यंत ४५ लाख ३९ हजार ५५३ अहवाल पॉझिटीव्ह निघाले आहेत. सध्या राज्यात १६.९३ टक्के पॉझिटीव्हिटी रेट आहे. सध्या ४१ लाख १९ हजार ७५९ लोक गृह विलगीकरणात आहेत तर २० हजार ११८ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
पुणे शहर अपडेट्स
- दिवसभरात ४८९५ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ४६८८ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ९१ रुग्णांचा मृत्यू. २८ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १३९२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४१५३९९.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४२०३.
- एकूण मृत्यू -६७३२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३६४४६४. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०५०१.
