fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

भाजपच्या वतीने व्यापक रक्तदान शिबिराचा निर्धार – चंद्रकांत पाटील

पुणे दि. २८ : शहर आणि राज्यात रक्ताची कमतरता पाहता पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्यापक रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहेत. पुणे शहर भाजपच्या वतीने कमीत कमी दहा हजार बाटल्या रक्त संकलित करण्याच्या निर्धार असल्याचे सांगत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

भारतीय जनता पार्टी पुणे शहर, कॅटलिस्ट फाउंडेशन तसेच जहांगीर रुग्णालयाच्या सहयोगाने बोपोडी येथील व्हीजन नेक्स्ट नेत्र रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप शहर सरचिटणीस संदीप लोणकर, पुणे शहर महिला  उपाध्यक्ष सुप्रिया खैरनार,शिवाजीनगर मतदारसंघ सरचिटणीस आनंद छाजेड, भाजप महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुख सोनाली भोसले,कोथरूड मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी,   व्हीजन नेक्स्ट रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अंबरीश दरक, शिवाजी नगर मतदार संघ युवामोर्चा सरचिटणीस रोहित भिसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या कोव्हिड महामारीमुळे राज्यात रक्तदान शिबिर कमी प्रमाणात होत आहेत. यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान कमी झाल्याने अनेक गंभीर रुग्णांना रक्त कमी पडत आहे. यामुळेच आम्ही राज्यभर रक्तदान शिबिराचा उपक्रम हाती घेतला आहे. पुणे शहर भाजपच्या वतीने आम्ही १०,००० रक्त बाटल्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी काल पर्यंत ३,५०० बाटल्या रक्त संकलित झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट आम्ही या आठवड्याभरात पूर्ण करू.

सुनील माने म्हणाले, देशावर आणि राज्यावर आलेल्या या गंभीर संकटामध्ये लोकांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील आहे. राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हणून जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल औंध – बोपोडी भगातील नागरिकांचा आभारी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading