Saturday, June 13, 2026
PUNE

काशीकापडी समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर

पुणे : काशीकापडी पुरम सोसायटी व ससून ब्लड बँक आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बालरोग तज्ञ डॉ. सोनाली पालकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, शैलेश वेडेपाटील, नगरसेविका अल्पना वरपे, गणेश वरपे,संतोष गोणेकर, राजा मुकेरकर, विशाल कोमकर यावेळी उपस्थित होते.

अल्पना वरपे म्हणाल्या,कोरोनाचे संकट शहरावर आले आहे. आज रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करायला पुढे यायला हवे. काशीकापडी पुरम सोसायटीच्यावतीने  रक्तदान शिबीराचा राबविलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.

दिलीप वेडे पाटील म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक ठिकाणी, अनेक जणांना रक्तदानाची गरज असते. परंतु कोरोनाच्या या काळात अनेक जण रक्तदान करायला पुढे येत नाहीत.  परंतु सामाजिक भान जागृत ठेवून काशीकापडी समाजाने रक्तदान शिबीर राबविले,असे त्यांनी सांगितले

अतुल भिंगारकर म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. १ मे नंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर पुढील दोन महिन्यांत अनेकांना लसीकरणामुळे रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे आणि एक नवीन संकट उभे राहील. त्यामुळे  लसीकरण करण्याच्या आधी प्रत्येकाने रक्तदान करा असे, आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading