fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

डॅशबोर्ड अपडेट करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी भाजप अपयशी; आता आयुक्तांनी पुढाकार घ्यावा – गोपाळदादा तिवारी

चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांचा विचार करावा आपल्या मोजक्या मतदारांचा नाही; गोपाळदादा तिवारी यांची टीका

पुणे दि २७ – नागरिकांना आरोग्यसेवा देण्याची महापालिकांची जबाबदारी आहे. “कोरोना उद्रेक होत असतांना” जसे “रेमडेसीव्हीर इंजेक्शन्स”ची पुर्तता मा ‘जिल्हाधिकारी अखत्यारीत समिती नेमून’, थेट हॅास्पीटल्सनाच ‘रेमडेसेव्हीर इंजेक्शन्स पुरवले जात आहेत’, त्यामुळे ‘रूग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव, मानसिक ताण- तणाव व पैशांचा चुराडा’ वाचतो आहे.. त्यामुळे अशाच प्रकारे…
“हॅास्पीटल बेड, ॲाक्सीजन वा व्हेंटीलेटर (आयसीयू) बाबत, देखील नागरिकांना धावाधाव न करता (रीयल टाईम) अद्यावत डॅश-बोर्ड” ची सुविधा तातडीने मिळणे अत्यावश्यक आहे.. व त्याचा पुरेपुर वापर करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनीच जनतेस करावे व डॅशबोर्ड अपडेट ठेवावा”.. असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी यांनी ‘पुणे महापालिकेस’ केले…!

वास्तविक गेले काही दिवस कोरोना रूग्णांची संख्या काही अंशी घटते आहे.. याचा फायदा घेऊन ‘संसर्ग झालेले रूग्णांना ताबडतोब (डॅश बोर्ड माध्यमातून, विनाविलंब) बेड मिळणे गरजेचे आहे.. याची युध्द-पातळीवर अंमलबजावणी झाली तरच् संसर्गजन्य रूग्ण व इतर नागरीक यांचेतील साखळी तुटू शकेल..!
पुणे शहर हे ‘विद्येचे व आयटी चे माहेरघर’ समजतात व ‘निष्णात अभियंते’ पुणे शहर परीसरात सहज ऊपलब्ध होऊ शकतात.. त्यांच्या सहाय्याने पुणे मनपा परीसरातील सर्व सरकारी व खाजगी हॅास्पीटल मधील बेड्स, ॲाक्सीजन, आयसीयू इ बाबतची अद्यावत माहीतीचा Real Time ‘डॅश बोर्ड’ ऊभा करणे, हे “वैद्यकीय अधिकाऱ्यांचे” काम नसून, ते तांत्रिक क्षेत्रातील तज्ञांचेच काम आहे..ती माहीती ‘तांत्रीक दृष्ट्या’ परीपुर्ण नसल्याने, रूग्णांच्या नातेवाईकांचा मोठा वेळ खर्च होऊन, मानसिक ताण व हाल अपेष्टा होत आहेत..!
सोबत देत असलेल्या “डॅश – बोर्ड” स्क्रीन शाॅट मध्ये ५ – ५ व्हेंटीलेटर्स, ॲाक्सीजन बेड रीकामे असल्याचे दर्शवतात व ३-४ दीवस त्यावरील माहीती मध्ये ‘चकार शब्दांचा बदल देखील होत नाही’…? हे सखेद आश्चर्य आहे.. वास्तवतेत काही शेकडो व हजारोंच्या संख्येत रोज नविन “रूग्ण नोंदणी व डीस्चार्ज” होत असल्याची नोंद होत आहे…मग “डॅश-बोर्ड” अद्याप वा सतत “हॅंग झाले आहेत काय”…? ते तांत्रिक दृष्ट्या सक्षम व अद्यावत का ठेवू शकत नाही…? …?
…. देशात व राज्यात, रेल्वे, विमान व बस वाहतूक, थिएटर बुकिंग तसेच ११वी ॲानलाईन प्रवेश किंबहुना लसीकरण नोंदणी इ सर्व तंतोतंत कार्यरत होत असतांना, ‘पुणे शहर हद्दीतील कोरोना रूग्णांसाठीचे उपलब्ध बेड्स’ची माहीती मात्र अजूनही अद्यावत व आधूनिक पध्दतीने (Automatic/ स्वयंचलीत) डॅश-बोर्ड वर मिळू शकत नाही हे ‘पुणे मनपास’ लाजिरवाणे नाही काय..? का मुद्दाम काही रीकामे बेड्स ची संख्या व माहीती सार्वजनिक होऊ द्यायची नाही..(?)..असे काही आहे काय..? असा ही प्रश्न त्यांनी ऊपस्थित केला.. व मनपा प्रशासना बरोबरच् ‘सत्ताधारी भाजप’चे हे सपशेल अपयश असल्याचे सांगितले..!!! (त्यामुळे सत्ताघारी पक्षाने अजूनही (४१% नागरीकांसाठीच) व्यक्तीगत व पक्ष पातळीवर कामे करणे सोडून, पुणे शहरातील सु३२ लाख लोकांकरीता ‘मनपा प्रशासनाच्या माध्यमातून’ धोरणात्मक निर्णयांच्या कृतीशीलतेची गरज अधिक आहे ..!!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading