fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

दत्तचरणी दवणा वनस्पतीची मनोहारी आरास

पुणे : तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणा-या दवणा या वनस्पतीची मनोहारी आरास दत्तमहाराजांच्या चरणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आली. दवणा ही औषधी वनस्पती असल्याने लवकरात लवकर कोरोना महामारी समूळ नष्ट होऊ देत, अशी प्रार्थना या वनस्पतीची आरास करुन करण्यात आली. 
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात दवणा वनस्पतीची आरास करण्यात आली होती.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. 


चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री दत्तयाग आरती मंडळाचे महेश ठोंबरे, प्राजक्ता ठोंबरे यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला. माध्यान्य आरती देणगीदार विलास केंजळे व कुटुंबिय यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रख्यात ह्रदयरोगतज्ञ डॉ.ॠतुपर्ण शिंदे देखील उपस्थित होते. दवण्याची आरास करताना विविधरंगी सुगंधित फुले लावण्यात आली होती. दत्तमहाराजांना दवण्याचा हार घालण्यात आला. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही आरास केली. 


सुनिल रुकारी म्हणाले, तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये याचा वापर होत असल्याने दवणा वनस्पतीला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मंदिरात या वनस्पतीची आरास करुन कोरोनामुक्त भारत व संपूर्ण जग होवो, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत. 
डॉ.पराग काळकर म्हणाले, मूळ संस्कृत दमना नाव असलेली औषधी वनस्पती मूळची काश्मिरमधील हिमालयातील आहे. नावाप्रमाणे वात, पित्त, कफ या त्रिदोषाचे दमन करणी ही वनस्पती औषधी आहे. तसेच ही वनस्पती सुवासिक देखील आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading