‘कोविड काळातील मार्केटिंग मॅनेजमेंट’ भारती विद्यापीठ आयएमईडी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रास प्रतिसाद
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप (आयएमईडी) आयोजित ‘कोविड-१९ काळातील आणि त्यानंतरची स्ट्रॅटेजिक मार्केटिंग मॅनेजमेंट’या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रास चांगला प्रतिसाद मिळाला. २३,२४ एप्रिल रोजी हे ऑनलाईन दोन दिवसीय चर्चासत्र पार पडले.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप (आयएमईडी)चे संचालक आणि भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते.
मोहन पाटील,रमेश संगारे,विशाल सिन्हा,अजित नरखेडे,सुधींद्र राव,डॉ श्याम शुक्ला,योगेश गुरव हे मान्यवर सहभागी झाले. या चर्चासत्रात अनेक संशोधनपर निबंध सादर करण्यात आले.
दीपक नवलगुंद,डॉ भारती जाधव,डॉ श्रद्धा वेर्णेकर,डॉ विजय फाळके,उदय देसाई,विनीत वेंकटेश्वरन,प्रियांशी श्रीवास्तव,प्रतीक्षा सिंग यांनी संयोजन केले.
‘कोविड साथीच्या काळात आणि नंतर मार्केटिंग साठी मर्यादा आहेत. मात्र ,अर्थचक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी उद्योगांचे चक्र सुरु राहणे आवश्यक आहे. मार्केटिंग करताना चांगल्या प्रतिसादासाठी इमोशनल इंटेलिजन्सच्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे’,असा सूर चर्चासत्रात उमटला. विशाल सिन्हा यांनी ‘अकाउंट बेस्ड मार्केटिंग ‘विषयावर,अजित नारखेडे यांनी ‘अल्टरनेट मार्केटिंग चॅनल्स ‘ विषयावर तर सुधींद्र राव यांनी ‘डेटा ड्रिव्हन मार्केटिंग सोल्युशन्स’ मार्गदर्शन केले.
