दिल्ली – ऑक्सिजन अभावी 20 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत एका रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली होती. तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे म्हटले होते. आता दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णांना 3 हजार 600 लिटर ऑक्सिजनची गरज होती. पण शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त दीड हजार लिटर ऑक्सिजनचा पुरवठा झाला. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू झाला.
जयपूर गोल्डन रुग्णालयात आजही 200 रुग्ण दाखल आहेत आणि त्यांच्यासाठी पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध नाही. शुक्रवारी गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना दिल्लीच्याच गंगाराम रुग्णालयात 20 रुग्णांचा मृत्यू झाला. फक्त दिल्लीत नाही तर देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णालयांचा मृत्यू होत आहे.
