fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

Breking News – कोविड केअर सेंटरमध्ये आग; 13 जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 23 – विरार मधील विजय वल्लभ कोविड सेंटर हॉस्पिटलला आग लागल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज पहाटे 3 वाजता रुग्णालयातील आयसीयू विभागात आग असून यात 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. दिलीप शाह यांनी दिली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कोविड केअर सेंटरला आग लागण्याची राज्यातील ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील कोविड केअरला आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading