Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNE

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कोविड वॉर्डमध्ये जाऊन वाढविले कोरोना योद्ध्यांचे मनोबल

पुणे, दि. 20 – कोरोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांना कोरोनायोद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आपल्याला युद्धभूमीवर, म्हणजेच प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर येतो! याचं कोरोना योद्ध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी प्रत्यक्ष कोविड वॉर्डात डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधला.

या थरारक भेटीचा अनुभव डॉ. विश्वजित कदम यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे, त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की,

वसा जनसेवेचा …
कोरोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांना कोरोनायोद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आपल्याला युद्धभूमीवर, म्हणजेच प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर येतो!
कालचा अनुभव अजूनही माझ्या मनात घर करून आहे. पुण्यातील माझ्या भारती हॉस्पिटलमध्ये थेट कोरोना वॉर्डात जाऊन मी डॉक्टर, नर्सेस आणि पेशंटसमवेत संवाद साधला. साधारण ४० ते ४५ मिनिटे या वॉर्डात मी पीपीई किट घालून होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे कोरोना योद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी!


कुणाच्या घरी चिमुकली आपल्या आईची वाट पाहत असेल, तर कोणाचे कुटुंबीय काळजीने त्रस्त असतील. पण, या कोरोना विरोधातील लढाईत स्वतःच्या जिवाची, परिवाराची तमा न बाळगता या डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे सेवाकार्य गेले वर्षभर अथकपणे सुरू आहे.

भारती हॉस्पिटल व वैद्यकीय सेवांचे जाळे उभारताना आपल्या स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा संस्कार दिला होता. आज पीपीई किटमधील देवदूत हाच जनसेवेचा वसा मनोभावे आचरत आहेत. त्यांच्या कार्याला माझा पुन्हा एकदा मनापासून सलाम!
जनसेवेच्या या संस्काराला सर्वतोपरीने पुढे नेण्याचा, त्याला पाठबळ देण्याचा निर्धार मीदेखील या निमित्ताने पुन्हा व्यक्त करतो!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading