रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना अन्नधान्याचे ४६ कीट वाटप कुमावत बेलदार विकास संस्थेच्या वतीने मदत
पुणे : कुमावत बेलदार विकास सेवा संस्थेच्या वतीने रमजानच्या पवित्र पर्वावर मुस्लिम बांधवांना अन्नधान्याचे ४६ कीट देण्यात आले. एक हात मदतीचा, वसा माणुसकीचा या निर्धाराने देवळाची तालीम चौक, पोलीस चौकीजवळ, गुरुवार पेठ या ठिकाणी गरजू महिलांना मदत करण्यात आली.
यावेळी राजाभाऊ रजपूत, पराग नाईक, आशिष रजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या काजल मिसाळ यांच्या हस्ते अन्नधान्य कीट देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील नाईक यांनी केले होते. अन्नधान्य किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, रवा, खजूर, शेवई यांचा समावेश आहे.
स्वप्नील नाईक म्हणाले, पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती पुणे शहरात निर्माण झाली आहे. या परिस्थितीत अनेकांना काम नाही. रमजानचा पवित्र महिना देखील सुरु झाला आहे. त्यामुळे गुरुवार पेठेतील मुस्लिम बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
