Saturday, May 30, 2026
Business

युवाकडून ‘व्‍हर्टेक्‍स जिओ बॉक्‍स’च्‍या लाँचसह स्‍टेशनरी पोर्टफोलिओमध्‍ये वाढ

पुणे – युवा या नवनीतच्‍या स्‍थानिक स्‍टेशनरी ब्रॅण्‍डने व्‍हर्टेक्‍स जिओ बॉक्‍स लाँच केला आहे. प्रिमिअम जिओमेट्री बॉक्‍समध्‍ये उच्‍च दर्जात्मक साहित्‍याचा समावेश आहे, जे कार्यक्षमता व अचूकतेची खात्री देतात. बॉक्‍समध्‍ये एक कंपास, सेट स्‍क्‍वेअर, प्रोटेक्‍टर, डिव्‍हायडर, पेन्सिल इरेजर व शार्पनर आहे. तसेच बॉक्‍समध्‍ये मेकॅनिकल पेन्सिल, एक लीड बॉक्‍स आणि नेहमीच्‍या लाकडी पेन्सिलीसह इतर साहित्‍य देखील आहेत. 

युवाच्‍या नवीन जिओ बॉक्‍सचे अनेक लाभ आहेत. साहित्‍य दोन्‍ही बाजूस असलेल्‍या ट्रेमध्‍ये ठेवण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ओरखड्यांपासून संरक्षण होण्‍याची खात्री मिळते आणि सुलभपणे साहित्य मिळते. कंपास व डिव्‍हायडर इतर जिओमेट्री बॉक्‍सेसच्‍या तुलनेत अत्‍यंत उच्‍च दर्जाचे आहेत. कंपास भौमितिक रचना करतेवेळी परिपूर्ण सममितता व स्थिरतेच्‍या खात्रीसाठी स्‍पर गियर तंत्रज्ञानासह बनवण्‍यात आली आहे. डाय-कास्‍ट कंपास अचूकता व तंतोतंतपणाची खात्री देते.

युवा ग्राहकांना मूल्‍य देणारी उत्‍पादने निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो. युवाच्‍या आर्ट व क्राफ्ट विभागातील या अनोख्‍या उत्‍पादनाचा अनुभव घेण्‍यास सज्‍ज राहा.

युवा व्‍हर्टेक्‍स जिओ बॉक्‍सच्‍या लाँचबाबत बोलताना युवाचे मुख्‍य धोरणात्‍मक अधिकारी व प्रवक्‍ता अभिजीत सन्‍याल म्‍हणाले, ”आमचा ब्रॅण्‍ड युवाने नेहमीच सर्जनशीलतेच्‍या अभिव्‍यक्‍तीला पाठिंबा दिला आहे. आम्‍हाला बाजारपेठेमध्‍ये सर्वोत्तम उत्‍पादनाची कमतरता दिसून येत आहे आणि या विभागामध्‍ये विश्‍वसनीय उत्‍पादन असण्‍याची गरज होती. व्‍हर्टेक्‍स या मागणीची उत्तमरित्‍या पूर्तता करतो आणि विश्‍वसनीय इन्‍स्‍ट्रूमेंट सेट असण्‍याची इच्‍छा असलेल्‍या मुलांसाठी सर्वोत्तम आहे.”    

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading