fbpx
Friday, April 19, 2024
Business

लग्नसराईच्या निमित्ताने कल्याण ज्वेलर्सच्या ‘मुहूरत’ कॅम्पेनचा शुभारंभ

मुंबई,  दि. 19 – भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ज्वेलरी ब्रॅंड्सपैकी एक कल्याण ज्वेलर्सने खास लग्नासाठीच्या दागिन्यांचा आपला ब्रँड मुहूरत‘ अधोरेखित करणारे नवे कॅम्पेन लॉन्च केले आहे.  नवीन जाहिरातीमध्ये कल्याण ज्वेलर्सची ग्लोबल ब्रँड अम्बॅसॅडर कतरीना कैफराष्ट्रीय ब्रँड अम्बॅसॅडर्स अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर प्रभू गणेशन यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.  या जाहिरातीचे गुडी तू चलीरे‘ हे गाणे अतिशय हृदयस्पर्शी आहे.  शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे स्वतः शंकर महादेवन आणि साशा तिरुपती यांनी गायले आहे.

या जाहिरातीमध्ये विविध संस्कृतींचा सुरेख संगम चित्रित करण्यात आला आहे.  दिल्लीतील नववधूच्या भूमिकेत कतरीना कैफ आपल्या तामिळ वरासोबत लग्नासाठी  तयार होत आहे.  तिच्या आईवडिलांच्या भूमिकेत अमिताभ आणि जया बच्चन आपल्याला या जाहिरातीत पाहायला मिळतात.  लग्नविधी सुरु होण्याआधी नववधू आणि तिच्या पित्याच्या मनातील विविध नाजूक भावभावनांचे हिंदोळे या जाहिरातीत अचूक टिपण्यात आले आहेत.

अवघ्या ७५ सेकंदांमध्ये ही ऍड फिल्म एका शानदार हवेलीमध्ये सुरु असलेल्या लग्नसमारंभाचे अतिशय सुंदरभावस्पर्शी आणि आनंददायी चित्र आपल्यासमोर उभे करते.  कल्याण ज्वेलर्सने लग्नासाठी खास बनवलेल्या मुहूरत‘ ब्रँडचे स्टायलिश आणि पारंपरिक दागिने यामध्ये पाहता येतात.

नव्या मुहूरत कॅम्पेनबद्दल कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमण यांनी सांगितले, “भारतातील लग्ने म्हणजे वैविध्याचा अनोखा आविष्कार!  विविध परंपरारूढी आणि खास क्षण  भारतीय लग्नांमध्ये पाहायला मिळतात.  आमच्या नवीन मुहूरत कॅम्पेनमध्ये आम्ही अशाच एका भारतीय लग्नाचीनववधू आणि तिच्या परिवाराची गोष्ट सादर करत आहोत.  लग्नामध्ये नववधू जे खास दागिने परिधान करते त्यामध्ये देखील भरपूर वैविध्य आढळून येते.  संपूर्ण भारत भर पसरलेला ब्रँड या नात्याने आम्ही असे मानतो की या खास दिवशी जे दागिने घातले जातात ते प्रत्येक स्त्रीसाठी नुसते दागिने नसतात तर तो एक वारसा असतोतिचा अभिमान असतो.  आमच्या खास तयार करण्यात आलेल्या आणि नव्याने सुधारित मुहूरत वेडिंग कलेक्शनमध्ये अनेक एक्सक्लुसिव्ह डिझाइन्स आहेत जी प्रत्येक क्षेत्रातील खास परंपरा डोळ्यासमोर ठेवून स्थानिक कारीगरांकडून घडवण्यात आली आहेत.”   

कल्याण ज्वेलर्सचे क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर्स मंजू वॉरियरशिवराज कुमारप्रभू गणेशन आणि अक्किनेनी नागार्जुन यांनी देखील या कॅम्पेनच्या प्रत्येक क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये भूमिका केल्या आहेत.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading