fbpx
Thursday, April 25, 2024
Business

होंडा टुव्हीलर्स इंडियातर्फे नवीन परदेशी व्यवसाय विभागाची घोषणा

गुरुग्राम, दि. 15 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआ) – होंडाच्या भारतातील एकमेव दुचाकी कंपनीने आज नवीन परदेशी व्यवसाय विस्तार व्यावसायिक विभागाची घोषणा करत ‘मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड’मधे प्रवेश केला आहे.

परदेशी व्यवसाय विस्तार हा नवा विभाग आता होंडा टुव्हीलर इंडियाच्या जगभरातील सर्वात अत्याधुनिक दुचाकी बाजारपेठांना जागतिक दर्जाच्या दुचाकींची निर्यात करण्याचे उद्दिष्ट पुढे नेईल.

होंडा टुव्हीलर्स इंडियामधे प्रमुख संस्थात्मक पुनर्रचना करण्यात आली असून त्याअंतर्गत वेगवेगळ्या विभागांतील 100 असोसिएट्स होंडा इंडियाला दुचाकी निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या समान उद्दिष्टाच्या दिशेने काम करण्यासाठी एकत्र येतील.

होंडाच्या मानेसर केंद्रात वसलेला नवीन परदेशी व्यवसाय विस्तार विभाग धोरणात्मक पातळीवर एसईडीबीक्यूची (सेल्स, इंजिनियरिंग, विकास, पर्चेसिंग आणि क्वालिटी) कामे एकाच छताखाली एकत्र आणून जागतिक पातळीवर उपयुक्त कार्यकारी यंत्रणा तयार करतील. नवीन परदेशी व्यवसाय विभाग होंडा टुव्हीलर्स इंडियाच्या निर्यात- आयात विक्री कामाची दर्जा, खरेदी, विकास, होमोलॉजिशन, उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षमतांशी मेळ घालणार आहे.

होंडाच्या नवीन परदेशी व्यवसाय विस्तार विभागाच्या धोरणाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘भविष्यवादी दृष्टीकोनाचा अवलंब करत होंडा टुव्हीलर्स इंडियाने होंडाच्या जागतिक मोटरसायकल व्यवसायातील आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान आणखी बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर बीएस- सिक्सच्या युगात ‘मेक इन इंडिया’, भारतासाठी आणि जगासाठी’चा पुढचा अध्याय लिहिला जात आहे. या संस्थात्मक पुनर्रचनेसह कंपनी आपल्या व्यवसायाची घडण आणखी मजबूत करत आहे तसेच जागतिक होंडाकडून असलेल्या उच्च अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मकता सुधारत आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading