पिरामल रिटेल फायनान्सतर्फे व्यवसाय विस्तार – ग्राहकोपयोगी आणि युज्ड कार अर्थसहाय्य क्षेत्रात प्रवेश
मुंबई, दि . 15 – पिरामल रिटेल फायनान्स कंपनीने आज विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश असलेल्या नव्या रिटेल फायनान्सिंग प्लॅटफॉर्मचे लाँच केले. पिरामल रिटेल फायनान्स हा पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड (‘PEL’, NSE: PEL, BSE: 500302) कंपनीच्या पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लि. (PCHFL) या उपकंपनीअंतर्गत कार्यरत असलेली व्यावसायिक कंपनी आहे. लघु व मध्यम- शहरी भारतावर (भारतीय बाजारपेठा) लक्ष केंद्रित करत कंपनीने भारतातील ग्राहकांच्या विविध प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नवी आणि विस्तारक्षण उत्पादने आणली आहेत. गेल्या तिमाहीमधे पिरामलने डिजिटल पर्चेस फायनान्स आणि युज्ड कार फायनान्सिंग सोल्यूशन्स लाँच केली होती. हा व्यवसाय विस्तार आणखी मजबूत करण्यासाठी पिरामल तंत्रज्ञान यंत्रणेतील विविध सहभागींशी भागिदारी करत आहे आणि या प्रदेशांतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आहे. आर्थिक वर्ष 21 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पिरामल दोन फिनटेक भागिदारी कंपन्यांसह काम सुरू करणार आहे. त्यात खरेदी वित्त (पर्चेस फायनान्स) क्षेत्राक झेस्टमनीसोबतची भागिदारी आणि युज्ड कार वित्त सहाय्य क्षेत्रातील कार्स24 चा समावेश आहे. ‘डिजिटल अट इट्स कोअर’ या धोरणासह पिरामल प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर वित्त सहाय्य देण्यासाठी जलद व सोपा मार्ग मिळतो.
या उत्पादनांच्या लाँचनंतर पिरामल रिटेलद्वारे इच्छित बाजारपेठांमधे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या उत्पादनांची संख्या सातवर गेली असून त्यात – परवडणारी गृहकर्जे, व्यापक श्रीमंत वर्गासाठी गृह कर्ज, मालमत्तेवर कर्ज, सुरक्षित लघु व्यवसाय कर्ज, खरेदी वित्त, असुरक्षित कर्ज आणि युज्ड कार्ससाठी कर्ज यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षभरात पिरामल रिटेलने आपले प्रत्यक्ष अस्तित्व लक्षणीय प्रमाणावर विस्तारले असून त्यात देशभरातील लहान व मोठी शहरे मिळून 40 ठिकाणांचा समावेश आहे. भौगोलिक विस्तार योजना अशीच सुरू राहाणार असून पुढील तीन महिन्यांत 10 नवी ठिकाणे सुरू होतील. रिटेल फायनान्सिंगची कर्मचारी संख्याही वाढली असून कोविड महामारीदरम्यान ती दुपटीने वाढवून 1000 वर नेण्यात आली आहे.
पिरामल रिटेल फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयराम श्रीधरन म्हणाले, ‘भारतातील बजेट ग्राहक हा आमचा मुख्य ग्राहक वर्ग आहे. या ग्राहकांसाठी गृह वित्त ही सर्वात महत्त्वाची आर्थिक गरज असते. मात्र, त्यांच्या व्यवसाय विस्तार करणे, सेकंड हँड कार खरेदी करणे अशा इतरही बऱ्याच गरजा असतात. अशाप्रकारच्या मोठ्या प्रमाणावर वंचित असलेल्या वर्गासाठी उपलब्ध असलेले कर्ज अतिशय मर्यादित आहे. पिरामल रिटेल फायनान्सचा विस्तारित मल्टी- प्रॉडक्ट प्लॅटफॉर्मने या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्याचे आणि भारताच्या विकास गाथेला योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.’
‘आर्थिक वर्ष 21 मधे यशस्वी कामगिरी केल्याचा, टेक प्लॅटफॉर्मची उभारणी केल्याचा, कर्मचारी वर्ग दुप्पट केल्याचा आणि उत्पादनांची संख्या तिप्पट केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. येत्या वर्षात सर्व यशस्वी संपादनांसह रिटेल व्यवसायांत गुंतवणूक करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
