कोरोनाच्या प्रसार लक्षात घेता ‘कॉर्डेलिया क्रूझ’ उद्घाटन लांबणीवर
पुणे, दि. १५ – ‘कॉर्डेलिया क्रूझ’ या पहिल्या स्वदेशी भारतीय क्रूझला मिळणारी पर्यटकांची पसंती व वाढती मागणी आणि प्रामुख्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता क्रुझच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आधी दि. ७ मे २०२१ निश्चित करण्यात आली होती परंतु सध्यपरिस्थिती लक्षात घेता ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. मात्र यासाठीचे बुकिंग सुरु ठेवण्यात आले आहे.
ड्रीम हॉटेल ग्रुपशी संलग्न असलेले वॉर्ड्वेज लेझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड द्वारा कर्डेलिया जलपर्यटन, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रीमियम क्रुझ लायनरने भारताच्या पूर्व व पश्चिम किनारे उदा. गोवा, दिव आणि लक्षद्वीप तर आंतरराष्ट्रीय कोलोम्बो, गाल्ले, त्रिन्कॉमाली, जॅफ्फना व मालदीवज या किनाऱ्यांची सैर करता येणार आहे.
सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी भारत सरकार, राज्य सरकार जी काही महत्वपूर्ण पावले उचलत आहेत त्यामुळे लवकरच परिस्थिती निवळेल असा विश्वाशी आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’ हे भारत सरकार, जलपर्यटन अधिकारी, बंदर प्राधिकरण व पर्यटन क्षेत्रासोबत कार्यरत आहे. जेणेकरून या महामारीच्या काळात सुरक्षित प्रवास पुन्हा सुरु करता येईल. या जलपर्यटनाला नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जात असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
वॉटरवेज लेझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष जर्गन बालोम विश्वासाने सांगतात की, “गेल्या 45 दिवसात संक्रमित लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तज्ञाच्या मते केंद्र आणि राज्य सरकारच्या तसेच डीजी शिपिंग आणि बंदर अधिकारी यांच्या युध्दपातळीवरील प्रयत्नांमुळे लवकरच आपला जलपर्यटन सुरू करू शकतील. कर्डेलिया प्रत्येक बाबतीत सुरक्षित प्रवासी वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. आपण ते करू शकतो आणि करणारच असा आम्हाला विश्वास आहे.”
ज्या इच्छुक प्रवाशांनी आधीच बुकिंग केले आहे त्यांनी आपल्या बुकिंग एजंटशी किंवा ‘कॉर्डेलिया क्रूझ’ यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात. ‘कॉर्डेलिया’ टीमशी ०२२ ६८८१११११ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. जेणे करून आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांना आपली सहल नव्या तर्खांनी नियोजित करता येईल.
