Saturday, May 30, 2026
PUNE

दुर्लक्षित गरजूंच्या मदतीसाठी मध्यमवर्गीय विकास मंच स्थापन

पुणे : समाजातील दुर्लक्षित मध्यमवर्गीय हा घटक आहे. या मध्यमवर्गीयांचा आत्मसन्मान जपत त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी मध्यमवर्गीय विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे, असे मंचाचे संस्थापक डॉ. मिलिंद संपगावकर यांनी सांगितले.


डॉ. मिलिंद संपगावकर म्हणाले, “सामान्यपणे गरिबांना अनेक लोक मदत करतात. सरकारचेही पॅकेजेस गरीब अथवा गर्भश्रीमंत लोकांसाठी येतात. मात्र, मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहतो. त्यांना सहसा कोणी मदत करायला जात नाही. तसेच मध्यमवर्गीय मदतीसाठी रांगेत उभारून मदतही घेत नाही. स्वतःचा आत्मसन्मान दुखावेल, या भावनेतून मध्यमवर्गीय उपाशी राहतील. पण मदत मागणार नाहीत.”
“या मध्यमवर्गीय विकास मंचामार्फत आत्मसन्मान न दुखावता त्यांना अन्नधान्य, औषध, नवीन कपडे, वह्या-पुस्तके आदी स्वरूपात मदत करणार आहोत. यामध्ये कुठलीही आर्थिक मदत केली जाणार नाही. तसेच या मंचाच्या माध्यमातून अधिकारांसोबतच कर्तव्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. कोरोना झाल्यानंतर बेड मिळावा हा अधिकार आहे, त्याचप्रमाणे कोरोना होऊ नये, याची काळजी घेणे, मास्क परिधान करणे व सोशल डिस्टंस्टिंग पाळणे हे आपले कर्तव्य बजवावे यासाठी जागृती केली जाणार आहे,” असे डॉ. संपगावकर यांनी सांगितले.


डॉ. संपगावकर पुढे म्हणाले, “ज्यांना मध्यमवर्गीयांना मदत करायची असेल, त्यांनी मंचाकडे संपर्क करावा. मदत देऊ इच्छिणाऱ्या आणि लागणाऱ्या व्यक्तीची भेट घालून देण्याचे काम मंचाद्वारे केले जाईल. मदत घेणाऱ्या व्यक्तीची माहिती अथवा फोटो जाहीर केले जाणार नाही. मदत देणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी करता येईल. मदत देणाऱ्यास मध्यमवर्गीय विकास मंचामार्फत आभारपत्र देऊन गौरवण्यात येईल.”


मध्यमवर्गीयांना मदतीसाठी पुढे यादुर्लक्षित आणि गरजू मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावे. मंचाचे सभासद व्हावे. यासाठी डॉ. मिलिंद संपगावकर (९९२१२१४२९९) यांना किंवा ७७९६८७५८४४ यावर संपर्क करावा किंवा https://forms.gle/MCfEeCNnNQMvH3Ld8 या गुगल लिंक अथवा www.drmilindsampgaonkar.com वर आपला अर्ज भरावा, असे आवाहन डॉ. संपगावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading