Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

Breking News – उद्या रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोनाविरोधातल्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई –राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन तयार करण्यास खूप दिवस लागत आहेत. राज्यात होणाऱ्या तुटवड्यावर लवकरच मात करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वाढत्या कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही दिली होती. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु कोरोनाला रोखण्यासाठी ८ ते १४ दिवस कडक निर्बंध लागू करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करत नाही आहोत परंतु अत्यावश्यक सेवांसाठी या वाहतूक सेवा सुरु राहणार आहेत.

कोरोनाविरोधातल्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज राज्यात ६० हजरा २१२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी रोज सव्वा २ लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन तयार करण्यास खूप दिवस लागत आहेत. राज्यात होणाऱ्या तुटवड्यावर लवकरच मात करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Update
उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभरात निर्बंध लागू होणार
राज्यात 144 कलम संचारबंदी लागू
सकाळी 7 ते रात्री 8 यवेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहील
सार्वजनिक वाहतूक चालू राहील
पावसाळी पूर्व कामे चालू रहातील
अधिस्वीकृती धारक पत्रकार सेवा देण्यास मुभा
कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक
हॉटेल्स बरोबर फेरीवाल्यांनी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल परवानगी राहील
रेल्वे, बस, लोकल, टॅक्सी सेवा सुरु राहील
अन्न सुरक्षा योजने अंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ
एक महिना
दोन लाख शिव भोजन थाळी महिनाभर मोफत देणार
35 लाख निराधार, वृद्धांना 1हजार अर्थआहाय्य
नोंदणीकृत घरेलू कामगार, अधिकृत फेरीवाले यांना तसेच 5 लाख परवानाधारक रिक्षाचालक 1500 रुपये अर्थसहाय्य
आदिवासी कुटुंबियांना 2000 रुपये मदत
हातावर पोट असलेल्याना 500 रुपये मदत
जिल्हाधिकारी यांना कोव्हीड नियंत्रण कामासाठी तसेच रुग्णसेवा नियमित ठेवण्यासाठी साठी 3 हजार 700 कोटी निर्धारित केला आहे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading