डॉक्टर, परिचारिका न दिसणाऱ्या शत्रूपासून नागरिकांचा बचाव करतात -एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले

पुणे : संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महामारीचे विचित्र संकट आले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही सीमेवर लढताना समोर दिसणाºया शत्रूबरोबर लढत होतो. पंरतु कोरोना हा शत्रू न दिसणारा आहे. त्याच्यापासून या परिचारिका आणि डॉक्टर आपल्याला वाचवत आहेत. त्यांना आपण साथ दिली पाहिजे, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. 

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष सुनिल पांडे (लोहगांवकर) यांच्यावतीने कोविड योध्दांचा सन्मान करण्यात आला. कमला नेहरू पार्क, प्रभात रोड येथील महाराष्ट्र मेडिकल फाऊंडेशनच्या जोशी हॉस्पिटल मधील लसीकरण करणा-या 20 डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. 
यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष सुनिल पांडे, भाजपा शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, विनायक नवयुग मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, हॉस्पिटलचे सीईओ डॉ. चंद्रशेखर कर्वे, डॉ. विजय अग्रवाल, भाजपाचे समीर हळदे, श्रीधर खांडेकर, ऋषिकेश आर्य आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व मिठाई देवून योध्दांच्या सन्मान करण्यात आला. 

रविंद्र साळेगावकर म्हणाले, समाजावर ओढावलेल्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओरोग्ययंत्रणा अत्यंत तत्परतेने काम करीत आहे. त्यांना आपण सहकार्य करण्यासाठी कोरोनाचे नियम प्रामाणिकपणे पाळले तरी खूप मोठी मदत होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले. 
डॉ. चंद्रशेखर कर्वे म्हणाले, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करताना रुग्णांशी जास्त संपर्क येतो तो परिचारिकांचा. डॉक्टर उपचारासाठी येतात उपचार करतात परंतु परिचारिका या त्या रुग्णांची काळजी तर घेतातच त्याचबरोबर त्यांच्याशी बोलून त्यांचे मानसिक धैर्य पण वाढवतात. हे करीत असताना गेल्या वर्षाभरात या परिचारिका एक इंचही मागे सरकल्या नाहीत. अत्यंत शांतपणे आणि धीराने या परिस्थितीचा सामना त्यांनी केला आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा कणा परिचारिका असतात, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: