Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात 56 हजार 286 नवीन रुग्ण, पुण्यात 7 हजारांहून अधिक कोरोनाबाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा धोका कमी झालेला नसून आज दिवसभरात तब्बल 56 हजार 286 बाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ होत असल्याने सरकारकडून सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात आज 56286 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि आज नवीन 36 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 26 लाख 49 हजार 757 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 21 हजार 317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात 7010 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 4099 रुग्णांना डिस्चार्ज.
  • करोनाबाधीत 43 रुग्णांचा मृत्यू. 16 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 999 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 312382

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 48939

  • एकूण मृत्यू – 5610

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 257833

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 23595

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading