fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात मंगळवारी ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण; २९७ जणांचा मृत्यू

पुणे शहरात ५ हजार ६०० नवीन रुग्ण

मुंबई, दि. ६ – मंगळवारी राज्यामध्ये ५५ हजार ४६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख १३ हजार ३५४ झाली असून ४ लाख ७२ हजार २८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यामध्ये मागील २४ तासांमध्ये २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांची संख्या ५६ हजार ३३० वर पोहोचली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे.

मंगळवारी २९७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९८ टक्के इतके आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५५ हजार ४९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईमध्ये १० हजारहून अधिक नवे रुग्ण

मुंबईमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी मुंबईमध्ये १० हजार ३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात ४ लाख ७२५ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर मुंबईत ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहर

  • दिवसभरात ५६०० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३४८१ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ४७ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २९९७२१.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४८२२.
  • एकूण मृत्यू -५५२६.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २४९३७३.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७३८९.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading