fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टतर्फे तालतपस्वी कै. पं. मधुकर कोठारे (लंडन) स्मृती शिष्यवृत्तीची घोषणा

पुणे : भारताचा ऐतिहासिक आणि कालातीत गुरू-शिष्य परंपरेचा वारसा पुढे चालू राहावा, आश्वासक युवा कलावंतांना कलोपासनेसाठी प्रोत्साहन मिळत राहावे या उद्देशाने उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टतर्फे तालतपस्वी कै. पं. मधुकर कोठारे (लंडन) स्मृती संगीत शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय अभिजात कला आणि संस्कृती संवर्धनासाठी मुंबई, पुणे, ठाणे येथे गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ सजगपणे कार्य करणार्‍या उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे संगीत शिष्यवृत्ती दिली जाते. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि तबलावादन कलांमध्ये, गुरुकुल पद्धतीने सातत्याने विद्यादान करणार्‍या ज्येष्ठ गुरूंच्या शिफारसींद्वारे, त्यांच्या पसंतीस प्राप्त ठरणार्‍या युवा आणि गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येकी वीस हजार रूपये आणि प्रमाणपत्र या स्वरूपात ही शिष्यवृत्ती दिली जाते.

सन 2021-22 या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी आणि कंसात गुरूंचे नाव : ओंकार सूर्यवंशी (तबला, गुरू पं. आनंद बदामीकर), गोपाळ गुडीबंडे (तबला, गुरू पं. आनंद बदामीकर), ऋचा घमंडे (कथक, गुरू विदुषी प्रेरणा देशपांडे), ईश्वर घोरपडे (शास्त्रीय गायन, गुरू. पं. विजय कोपरकर), विश्वजीत मेस्री (शास्त्रीय गायन, गुरू पं. शौनक अभिषेकी).
ग्वाल्हेर आणि आग्रा घराणा गायकीचे अध्वर्यू, रचनाकार आणि ज्येष्ठ संगीततज्ज्ञ कै. वि. रा. आठवले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, शास्त्रीय संगीत गायनासाठी विशेष प्राविण्य युवा पुरस्कार अहमदनगरच्या गायत्री शिंदे हिला जाहीर झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading