fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

वृक्षांची सिमेंट काँक्रिटिंगमुळे होणारी गळचेपी थांबवा – अनंत घरत

पुणे, दि.५ – शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वत्र फुटपाथ नवीन बांधणीची कामे चालू आहेत. मात्र अधिकराऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच ठेकेदार आणि मजुरांच्या अज्ञानामुळे झाडांचा नाहक बळी जात आहे. वृक्ष संवर्धन कायद्याप्रमाणे झाडांना १ मिटर व्यासाचे आळे करणे बंधनकारक असूनही ठेकेदारांकडून सर्रास पणे वृक्षांना काँक्रिटिंग मध्ये बंदिस्त केले जात आहे. त्यामुळे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी माय अर्थ फाऊंडेशन तर्फे पुणे मनपा आयुक्त आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. 

माय अर्थ फाऊंडेशन चे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले की, पुणे शहरात काही मागील काही महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिटिंगच्यामुळे टिळक रोड, ग्राहक पेठ समोर पिंपळाचे वृक्ष कोसळून पीएमपीएमएल बसचे नुकसान आणि एकाचा मृत्यू झाला होते. हे मोठे उदाहरण समोर असून पण आपल्या माध्यमातून फूटपाथ काम करीत असताना झाडांना सुरक्षेकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. पर्यावरणाची होत असलेली हानी पाहता विकासाच्या नावावर भकासिकरण केले जात आहे असे निदर्शनास येत आहे. ‘वृक्ष हेच ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्येवर उपाय आहे’, भिंतींवर “झाडे लावा झाडे जगवा” हे लिहण्यापेक्षा आहे ती झाडे तरी वाचविली गेली पाहिजेत. यावर मनपा ने लक्ष दिले पाहिजे.पुणेकर नागरिक पर्यावरण विषयावर जागृत असून आपण सदर विषयावर लक्ष घालून शहरातील सर्व फुटपाथ वरील झाडांचा सिमेंट काँक्रिटिंग पासून बचाव करावा आणि त्या भोवती छोटेसे आळे करावे जेणेकरून पाण्याचा निचरा सुद्धा जमिनीत होईल. गरज असल्यास माय अर्थ संस्था पुणे मनपाच्या ठेकेदारांना या वृक्ष संवर्धन विषयावर एनव्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया (ECI) च्या माध्यमातून मोफत कार्यशाळा घेऊन योग्य मार्गदर्शन करू शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading