कोरोना – राज्यात आज तब्बल 49 हजार 447, पुण्यात नवा उच्चांकी 5 हजार 720 रुग्ण

मुंबई, दि. 3 – राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. एकाच दिवसांत राज्यात तब्बल 49 हजार 447 रुग्णांची भर पडली आहे. तर 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टीव्ह रूग्ण आढळून आले आहे. तर आज 37,821 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 24,95,315 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.49 % एवढा आहे.

आज राज्यात 49,447 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर  277 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,03,43,123 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 29,53,523 (14.52 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,57,135 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 18,994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 4,01,172ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात उच्चांकी ५७२० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज.
  • कोरोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९.
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५१८.
  • एकूण मृत्यू -५४११.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३८८९०.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००६६.

Leave a Reply

%d bloggers like this: