रिअल इस्‍टेट क्षेत्रासाठी वेलस्पन वन लॉजिस्टिक पार्क्स तर्फे ‘पार्टनर पोर्टल’

 पुणे – वेलस्पन वन लॉजिस्टिक्स पार्क्स या भारतभरातील एकात्मिक निधी, विकास व असेट व्यवस्थापन प्लॅटफॉर्मने, उद्योगक्षेत्रात प्रथमच अशा प्रकारचा पुढाकार घेत, एक अनोखे, ऑनलाइन ‘पार्टनर पोर्टल’ आणले आहे. बाह्य संबंधितांमध्ये, विशेषत: जमीनमालक आणि ब्रोकर्स यांच्यात, प्रभावी सहयोग स्थापित करण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. बातम्यांचे आदानप्रदान करणारी व वेलस्पन वनच्या जमीन खरेदी व भाडेतत्त्वावर देणाऱ्या टीम्समध्ये थेट संवाद स्थापन करणारी पारदर्शक व कार्यक्षम यंत्रणा निर्माण करणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. ‘डिजिटल इंडिया’सारख्या उपक्रमांशी सुसंगती राखत उद्योगाचे डिजिटायजेशन करण्यासाठी ऑनलाइन व एकात्मिक प्लॅटफॉर्म आणणे हे वेलस्पन वनने टाकलेले मोठे पाऊल आहे. 


कंपनीच्या वेबसाइटच्‍या पार्टनर पोर्टल विभागात नोंदणी करून जमीनमालक, ब्रोकर्स, ग्राहक आणि इंटरनॅशनल प्रॉपर्टी कन्सल्टण्ट या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. नोंदणी करणाऱ्या सदस्याला निराळी क्रिडेन्शिअल्स दिली जातात. त्यांच्याद्वारे विशिष्ट डॅशबोर्डला अ‍ॅक्सेस मिळतो आणि त्यांना भारतभरातील जमीन व्यवहारांची आणि/किंवा गोदाम भाड्याने देण्याघेण्याच्या आवश्यकतांची माहिती (लीड्स) पुरवली जाते. भागीदार नवीन लीडची नोंदणी तर करू शकतातच, शिवाय एकही ई-मेल किंवा फोन कॉल न करता ते त्यांच्या पूर्वीच्या लीड्सची स्थिती तपासू शकतात. तपशील एकदा वेबसाइटवर शेअर झाले की, एक नियुक्त टीम या लीड्सची तपासणी व मूल्यमापन करते. 

अनावश्यक संपर्क (कॉरस्पॉण्डन्स) कमी करणे, लीड्सची पुनरावृत्ती टाळणे आणि वेगवानटर्नअराउंड कालावधी देणे ही या प्रणालीची उद्दिष्टे आहेत. त्यामुळे प्रत्येक माहिती अर्ज हा प्रभावी लीडमूल्यमापनाच्या दृष्टीने विकसित केला जातो. हे पोर्टल अत्यंत सुरक्षित आहे आणि येथे भरलेली सर्व माहिती गोपनीय राखली जाते, तसेच वेलस्पनमधील अगदी निवडक व संबंधित टीम्सच अशा प्रकारचे डेटा बघू शकतात.   रिअल-टाइम डेटा उपलब्ध असल्यामुळे, हे पोर्टल लॅपटॉप्स व डेस्कटॉप्स आदी हॅण्डहेल्ड उपकरणांद्वारे अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. प्रक्रिया अधिक सुलभ करण्‍याचे उद्दिष्ट ठेवून, वेलस्पन वन याचसाठी एक मोबाइल अॅप विकसित करण्याच्या प्रक्रियेतही आहे.

वेलस्पन वन लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक अंशुल सिंघल  म्हणाले    जमीन व लीजिंग यांसंदर्भातील लांबलचक व कालबाह्य प्रक्रिया नाहीसा करणारा एक अखंडित प्लॅटफॉर्म ही उद्योगक्षेत्राची गरज आहे. आमच्या ‘पार्टनर पोर्टल’ या वैशिष्ट्यपूर्ण व तंत्रज्ञानसक्षम उत्पादनाच्या माध्यमातून, एकाच ऑनलाइन चॅनलद्वारे उच्चस्तरीय पारदर्शकता, अखंडित संवाद व वक्तशीर अपडेट्स देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले, “या चॅनलमध्ये फीड केलेल्या सर्व लीड्सचे एका सीआरएमखाली मूल्यमापन केले जाते आणि त्यामुळे आम्हाला वेगाने लीड्सचे वर्गीकरण करण्याची तसेच उद्योगात खऱ्या अर्थाने उत्पन्न मिळवून देणाऱ्यांवर, अर्थात ब्रोकर समुदायावर, लक्ष केंद्रित करण्याची मुभामिळते.”  


तंत्रज्ञान-केंद्रित सोल्‍यूशन्‍ससाठी गरजेबाबत सांगताना अॅनारॉक प्रॉपर्टी कन्‍सल्‍टण्‍ट्स प्रा. लि.चे अध्‍यक्ष अनुज पुरी म्‍हणाले  अॅनारॉकमध्‍ये आम्‍ही आमच्‍या स्‍वत:च्‍या प्रॉपटेक उपक्रमांच्‍या माध्‍यमातूनसर्वोत्तम परिणाम प्राप्‍त केले आहेत आणि संपूर्ण रिअल इस्‍टेट मूल्‍यसाखळीमध्‍ये इतरांना अशाच प्रकारची तंत्रज्ञाने अवलंबण्‍यास प्रेरित केले आहे. प्रामुख्‍याने बदलाचे स्रोत असलेले तंत्रज्ञान रिअल इस्‍टेट व्‍यवसायाच्‍या प्रत्‍येक पैलूमध्‍ये प्रवेश करेल. व्‍यावसायिक व औद्योगिक रिअल इस्‍टेट आणि गोदाम विभागातील हा लक्षणीय प्रवेश कोविड-१९ नंतरच्‍या युगामध्‍ये आकर्षक संधी आहे, ज्‍यामुळे तंत्रज्ञान- संचालित दृष्टिकोनाला लाभ होईल. प्लॅटफॉर्म पूर्ण होण्‍यासाठी अंदाजे दहा महिने घेतलेल्‍या पायलट लाँचच्‍या टप्प्यात असताना त्यावर अनेक वापरकर्त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता.  

Leave a Reply

%d bloggers like this: