PUNE Breking – हॉटेल, मॉल, बार बंद; दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी

पुणे, दि. २ – पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे सुरू आहे.

बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. यावेळी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान पुण्यात संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचबरोबर हॉटेल, मॉल आणि बार दोन आठवडयांसाठी पुर्णपणे बंद असतील तर शाळा आणि महाविद्यालयांना २० पर्यंत सुट्टी राहणार आहे. परंतू पुर्वनियोजित परीक्षा वेळेत घेण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.

लग्न आणि अंत्यसंस्कार सोडून सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. पूर्वीचे निर्बंध आहे तसेच राहतील.

महत्वाचे मुद्दे

पुण्यात उद्यापासून (3 एप्रिल पासून ) पुढील 7 दिवस हॉटेल्स, रेस्तराँ,बार,मंदिरे,मॉल,pmp बसेस ,आठवडी बाजार,चित्रपट गृह ,नाट्यगृह बंद राहणार
पार्सल सेवा सुरू राहणार
अत्यावश्यक सेवा वगळून संध्याकाळी 6 ते सकाळी 6 संचारबंदी
लग्न समारंभाला 50 आणि अंत्यसंस्काराला 20 जणांना उपस्थित राहायची मुभा

मंडई, मार्केट यार्ड ..शारीरिक अंतर राखून सुरू..

बागा सकाळच्या वेळेत सुरू राहणार..

शाळा ,कॉलेज 30 एप्रिल पर्यन्त बंद

Mpsc,10 वी ,12 वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही

पुढच्या शुक्रवारी या निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाणार

Leave a Reply

%d bloggers like this: