सबज्युनियर राष्ट्रीय वुशू स्पर्धेत अनिष्का जैनला सुवर्ण पुण्याच्या आयाती डोळस हिला कांस्य

पुणे, दि.१ – महाराष्ट्र संघाने २० व्या सबज्युनियर राष्ट्रीय वुशू स्पर्धेत १ सुवर्ण आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. झारखंड मधील रांची येथे ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राच्या अनिष्का जैन हिने हरियाणाच्या खेळाडूला हरवून सुवर्णपदकाची कामगिरी केली. तर पुण्याच्या आयाती डोळस हिने कांस्यपदक पटकाविले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास झारखंडचे मुख्यमंत्री तसेच वुशू असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह बाजवा, महासचिव जितेंद्र बाजवा, सुहेल अहमद, महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सहसचिव सोपान कटके, झारखंड आॅलिम्पिकचे महासचिव मधुकांत पाठक उपस्थित होते. या राष्ट्रीय स्पर्धेत २९ राज्याच्या संघानी सहभाग घेतला होता. 

२४ किलो वजनी गटात अनिष्का जैन हिने हरियाणाला हरवून सुवर्णपदक प्राप्त केले. अनिष्का जैन औरंगाबादची असून रिव्हरलेड शाळेत पाचवीमध्ये शिकत आहे. आयाती डोळस पुण्याची असून सेंट झेवियर्स स्कूल या शाळेत ती शिकत आहे. सोपान कटके यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले. तसेच संघप्रशिक्षक महेश इंदापुरे आणि संघ व्यवस्थापक म्हणून दिपक भिसेन यांनी काम पाहिले.

Leave a Reply

%d bloggers like this: