Thursday, September 3, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

परभणी – राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर बलात्कार, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद

पुणे, दि 1 – परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे. “माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला.

“आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार… तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद” अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading