fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTNATIONALTOP NEWS

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. 1 – दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे.

प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही मागिती दिली आहे. ” भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे. ” असं ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले आहेत.

रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.गेली 30 वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून केली. कन्नड नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळाले यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले.

रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमवरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते.

रजनीकांत यांनी आजवर वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत. बिनधास्त, धडाकेबाज तसचं कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी अशा सर्व प्रकारच्या अभिनयातून त्यांनी दाक्षिण्यात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही त्यांची ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये ‘अंधा कानून’ सिनेमातून त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चाहत्यांची पसंती मिळवली. तर त्यानंतर हम, रा,वन, अगाज, रोबोट, शिवाजी द बिग बॉ़स अशा अनेक हिंदी सिनेमातून देशवासियांचं प्रेम मिळवलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading