‘पाकिजा’च्या मेकिंगची दुर्मिळ चित्रफीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात

पुणे, दि. 31 – सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘पाकिजा’ हा दिवंगत  अभिनेत्री मीनाकुमारी यांचा 70 च्या दशकातील अजरामर चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती सुमारे 15 वर्ष चाललेली होती. हीच चित्रपट निर्मितीची दुर्मीळ चित्रफीत आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे उपलब्ध आहे.


 सिनेरसिकांना चित्रपटांबरोबरच चित्रपट निर्मितीची दृष्य पाहण्यात रस असतो. पण जुन्या चित्रपटांचे असे रीळ मिळणे दुर्मीळच. पण आता पासकीजाची निर्मितीची चित्रफीत मिळाल्याने सिने अभ्यासकांना मदत होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘इंही लोगोने …’ या प्रसिध्द गाण्याचे कृष्ण धवल चित्रीकरण आहे. तसेच अगदी चित्रीकरणाच्या सुरवातीच्या टप्प्यातील (16 जुलै1956) हे असल्याने यामधील नैपथ्यही वेगळे आहे.

 कमल अमरोही यांच्या पाकिजा या चित्रपटात मोहम्मद रफी यांचे ‘जाये तो जाये कहा…’ ही न प्रदर्शित झालेली कवाली सुद्धा आहे. त्या सोबतच मराठा मंदिर, मुबंई ( ४फेब्रुवारी 1972) येथील चित्रपट प्रदर्शनावेळीची दृश्य आहेत.

 ” पाकिजाच्या चित्रपट निर्मितीची चित्रफीत ही 18 मिनिटांची असून 16एम एम ची आहे. जुनी चित्रफीत असल्याने अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. मात्र आम्ही ती योग्य पद्धतीने जतन करून सिनेरसिकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

  • प्रकाश मगदूम( संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

Leave a Reply

%d bloggers like this: